विशेष प्रतिनिधी नांदेड
आज देशाला स्वातंत्र्य मिळुन 73 वर्ष पूर्ण झाली तरी देशातील गोर-गरिब आणि भटक्या जमातीचे प्रश्न अजुन सुटलेले नाहीत. अश्या भटक्या जमातीतील पारधी आणि चितोजेय समाजातील लोकसंख्या बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे हा समाज आजही मुलभूत गरजा पासुन वंचित आहे कारण या दोन्ही समाजातील बहुतांश लोकांना अजूनही हक्कांचा निवारा मिळालेला नाही.आजंही बहुतांश लोक ग्रामिण रुग्णालय बिलोली या परिसरात रस्त्यावरच आपली गुजराण करत आहे त्यांची समस्या समजून घ्यायला कोणताही पुढारी समोर येत नाही.
अश्या कठीण परिस्थितीत आपली आयुष्याची घटका मोजण्याच्या पारधी व चितोडीच्या या समाजातील लोकांना कोरोनाच्या संकटामुळे आणखी संकटाच्या खाईत लोटले अश्या हाताला कोणताही कामधंदा नसल्याने पोटाची खळगी भरणे सुद्धा त्यांना आवघड होऊन बसले आहे एक संवेदनशील समाजातील जबाबदार नागरिक म्हणून बिलोली तालुक्यातील लोकप्रतिनिधीसह दानशुर नागरीकांनी या दोन्ही समाजातील गरजू लोकांना त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची आणि उत्तम प्रकारे ते रांहु शकतील अश्या निवाय्राची सोय करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे ता. उपाध्यक्ष विजय सुर्यवंशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा