मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बेटमोगरा येथील नाथ गोसाई भिक्षुकाना धान्य वाटप.

मुखेड प्रतिनिधी / भारत सोनकांबळे सद्यस्थितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात  कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू ने थैमान घातले आहे, या कोरोना विषणुपासून बचाव करण्यासाठी जनतेनी घराबाहेर पडू नये म्हणून जनता कर्फुच्या माध्यमातून २१ दिवसाचे  लॉकडाऊन चे आदेश देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्भूमीवर हातावर पोट असणाऱ्या गोर गरीब जनतेला धान्य पुरवठा संदर्भात तालुक्याचे आमदार डॉ.तुषार राठोड यांनी कार्यकर्त्यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने बेटमोगरा येथे धान्य वाटप करण्यात आले. ‘कोरोना विषाणू' संसर्गाने देश लॉकडाऊन झाला आहे.यामुळे देशातील अनेकजण आर्थिक संकटात सापडले आहेत.विशेषत: ज्यांचे पोट हातावर आहेत असा गरीब वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा परिसथितीमध्ये ते लोक करावेत तरी व खावेत तर काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे, असे लोक उपाशी राहू नये, म्हणून मुखेड तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ.तुषार राठोड यांनी कार्यकर्त्यांना आदेशित केले होते त्यांच्या आदेशाचे पालन करून तालुक्यातील बेटमोगरा गावातील युवा नेते तथा कृषी उत्पन्न बाजार सम...

शासनाचा सुशिक्षित बेरोजगार नर्सेसच्या जिवाशी खेळ - ब्रदर आदी बनसोडे यांचा सरकारशी थेट आरोप

मुखेड प्रतिनिधी भारत सोनकांबळे महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी लाखो नर्सेस उत्तीर्ण होतात, यामध्ये एएनएम,जिएनएम, बिएससी नर्सिंग असे लाखो रुपये खर्च करून शिक्षण घ्यावे लागते लगेच खाजगी हाॅस्पिटल मध्ये कामासाठी भन्नाट फिरुन ड्युटी जाॅईन करतात ते पण सात ते आठ हजार महिना काम करतात, २०१६ च्या कोर्ट नियमानुसार खाजगी नर्सेसला दवाखान्याच्या बेड वरुन म्हणजेच विस ते पंचवीस हजार पगार द्यावा असे कोर्ट म्हणतो तो नियम लागू करत नाहीत, आणि खाजगी हाॅस्पिटल मध्ये बोगस स्टाॅफ भरती करुन पाच हजार महिना काम देतात,मग रजिस्टर नर्सेस कुठे जायचं,लाखो रुपये तिन ते चार वर्ष शिक्षण घेऊन पाच हजारांवर महिना लाज वाटत आहे.. आता महत्वाचे म्हणजे कोरोणा व्हायरस आला आहे सर्व देशभरात भीतीचे वातावरण तयार झाले, शेजारच्या देशात आरोग्य सेवा देणारे डाॅक्टर, नर्सेस व इतर स्टाॅफ कोरोणाच्या रुग्णांचा उपचार करुन तेच मरण पावले आहेत, तरीही नर्सेस ड्युटी करत आहेत,  महाराष्ट्रात सरकारी दवाखाने असे आहेत की, तिन तेरा नऊ अठरा वाजलेली परिस्थिती आहे,तातडीच्या वेळी सोईसुविधा उपलब्ध नाहीत, तातडीचे इंजेक्शन नाहीत, डॉक्टर नर्सेस ...

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा चौथा स्तंभ वाऱ्यावर पत्रकारांसाठी आर्थिक तरतूद हवी - तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी (वैभव घाटे)  सद्यसथितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात करोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू या महाबीमारी ने धुमाकूळ माजवला असताना या बिकट परिस्थितीत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे राज्यात करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार वेगवेगळ्या भागात फिरून वार्तांकन करून सर्व सामान्य माणसाच्या व देशाच्या हितासाठी  आपले कुटुंब व संसार बाजूला ठेवून जनजागृती साठी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपली भूमिका अहोरात्र पार पाडत असून त्यांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने वर्तमान परिस्थितीत राज्य सरकार ने भरीव आर्थिक तरतूद करावी अशी मागणी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारी चा प्रादुर्भाव वाढत असून  या बाबत जनतेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झालेली आहे याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार प्रशासन च्या माध्यमातून उपाययोजना करत असले तरी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे राज्यातील पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेल...
जगातील सर्वात मोठी आध्यात्मिक संघटना ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्य प्रशासिका 104 वर्षाच्या राजयोगीनी दादी जानकी यांचे माऊंट आबू येथे निधन नांदेड  प्रतिनिधी  वैभव घाटे  (दि. 27 मार्च) स्त्रीशक्तिद्वारा संचलित जगातील सर्वात मोठी संघटना प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशासिका  ‘स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ राजयोगीनी ब्रह्माकुमारी डॉ. जानकीदादी यांचे वयाच्या 104 व्या वर्षी निधन झाले. माऊंट आबू , राजस्थान येथील ग्लोबल हॉस्पिटल मध्ये 27 मार्च रोजी सकाळी 2 वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांना गेल्या दोन महिन्यापासून श्वास आणि पोटाचा आजार होता, त्यांचेवर यासाठी उपचारही सुरु होते. त्यांचे अंतिम संस्कार ब्रह्माकुमारीज् मुख्यालय शांतीवन येथील संमेलन सभागृहासमोरील मैदानात आज दुपारी 3.30 वाजता होईल      स्त्री शक्तिच्या प्रेरणास्त्रोत ब्रह्माकुमारी दादी जानकी यांचा जन्म 1 जानेवारी 1916 मध्ये हैद्राबाद सिंध येथे झाला. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी ब्रह्माकुमारीज् संस्थेचा आध्यात्मिक मार्ग निवडला व त्य...