मुख्य सामग्रीवर वगळा

मुखेड कार्यक्षेत्रात 31 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह साजरा. मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे













मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे


सडक सुरक्षा - जीवन रक्षा
31 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 च्या
अनुषंगाने रस्ते हे समाजाच्या रक्त वाहिन्या असून सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड च्या वतीने मार्गदर्शन व रस्ता सुरक्षा मोहीम यशस्वी पणे राबविण्यात आलेली असून सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. अविनाश धोंडगे यांच्या मार्गद्शनाखाली व कार्यकारी अभियंता श्री सुधीर नाईक यांच्या सूचनांनुसार सार्वजनिक बांधकाम उपविभाग
मुखेड कार्यक्षेत्रात रस्ता सुरक्षा सप्ताह मोहीम 2020 ही प्रभावीपणे राबविण्यात आली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुखेड कार्यक्षेत्रातील राज्य रस्ते व इतर मार्गावर प्रवाशांसाठी व वाहन चालकांसाठी विविध बोधपृद
बॅनर, होरडिंग्ज, सूचना  फलक, माहिती पुस्तिका,वाहन चालकांची प्रतिज्ञा चे होरडिंग्ज इत्यादी लावण्यात आले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुखेड चे
उप अभियंता श्री ओमप्रकाश बेंबरे, शाखा अभियंता श्री पांपटवार, नीलकंठवार,श्री.शेंबाळे, श्री.उत्तम कुलकर्णी, श्री रवि, सखाराम कागणे, हुसैन शाहजौर, गोविंद राठोड, बळीराम राठोड इत्यादी कर्मचाऱ्यांनी या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मोहिमेत परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*बिलोली तालुक्यातील भटक्या जमातींच्या समस्या कधी संपणार_विजय सुर्यवंशी*

विशेष प्रतिनिधी नांदेड  आज देशाला स्वातंत्र्य मिळुन 73 वर्ष पूर्ण झाली तरी देशातील गोर-गरिब आणि भटक्या जमातीचे प्रश्न अजुन सुटलेले नाहीत. अश्या भटक्या जमातीतील पारधी आणि चितोजेय समाजातील लोकसंख्या बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे हा समाज आजही मुलभूत गरजा पासुन वंचित आहे कारण या दोन्ही समाजातील बहुतांश लोकांना अजूनही हक्कांचा निवारा मिळालेला नाही.आजंही बहुतांश लोक ग्रामिण रुग्णालय बिलोली या परिसरात रस्त्यावरच आपली गुजराण करत आहे त्यांची समस्या समजून घ्यायला कोणताही पुढारी समोर येत नाही. अश्या कठीण परिस्थितीत आपली आयुष्याची घटका मोजण्याच्या पारधी व चितोडीच्या या समाजातील लोकांना कोरोनाच्या संकटामुळे आणखी संकटाच्या खाईत लोटले अश्या हाताला कोणताही कामधंदा नसल्याने पोटाची खळगी भरणे सुद्धा त्यांना आवघड होऊन बसले आहे एक संवेदनशील समाजातील जबाबदार नागरिक म्हणून बिलोली  तालुक्यातील लोकप्रतिनिधीसह दानशुर नागरीकांनी  या दोन्ही समाजातील गरजू लोकांना त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची आणि उत्तम प्रकारे ते रांहु शकतील अश्या निवाय्राची  सोय करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग...

किराना दुकानदार झाले मालामाला ग्राहकांचे होत आहे बेहाल

नांदेड प्रतिनिधी  –वैभव घाटे  कोरोना ला आळा घालण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन बिलोली तालुक्यातील काही दुकानदार किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची जास्त भावाने विक्री करून परिस्थितीचा गैरफायदा घेऊन नागरिकांना लुटत आहेत. महाराष्ट्र व संपूर्ण देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने कोरोना ला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 31 मार्चपर्यंत तर केंद्र सरकारने 14 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. असे असले तरी नागरिकांना किराणा दूध भाजीपाला औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये, यासाठी दररोज एका ठराविक काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडे ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा अजिबात तुटवडा भासू नये, यासाठी सरकार विशेष खबरदारी घेत आहे. असे असले तरी बिलोली तालुक्यातील काही दुकानदारांकडून किराणा सामानासह जीवनावश्यक वस्तूंची जास्त दराने विक्री केल्या जात असून नागरिकांना खुलेआम लुटले जात आहे. साठेबाजी करून नागरिकांकडून जास्त पैसे घेऊन माणुसकी विकून खात आहेत   संपूर्ण देश...

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा चौथा स्तंभ वाऱ्यावर पत्रकारांसाठी आर्थिक तरतूद हवी - तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी (वैभव घाटे)  सद्यसथितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात करोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू या महाबीमारी ने धुमाकूळ माजवला असताना या बिकट परिस्थितीत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे राज्यात करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार वेगवेगळ्या भागात फिरून वार्तांकन करून सर्व सामान्य माणसाच्या व देशाच्या हितासाठी  आपले कुटुंब व संसार बाजूला ठेवून जनजागृती साठी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपली भूमिका अहोरात्र पार पाडत असून त्यांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने वर्तमान परिस्थितीत राज्य सरकार ने भरीव आर्थिक तरतूद करावी अशी मागणी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारी चा प्रादुर्भाव वाढत असून  या बाबत जनतेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झालेली आहे याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार प्रशासन च्या माध्यमातून उपाययोजना करत असले तरी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे राज्यातील पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेल...