मुख्य सामग्रीवर वगळा

सलगरा फाटा ते बेटमोगरा रस्त्याच्या कामाची तपासणी गुणनियंत्रण कक्ष औरंगाबाद मार्फत करण्यात यावी - भारत सोनकांबळे एक महिन्यापासून रस्त्याचे काम रखडले.











मुखेड प्रतिनिधी :-  भारत सोनकांबळे
मुखेड तालुक्यातील सलगरा फाटा ते बेटमोगरा या रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली होती पण बेटमोगरा येथील नवतरुण युवा नेतृत्व करणारे व
सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे
सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून वेळोवेळी प्रशासनाकडे अर्ज, निवेदने देऊन संबधित प्रशासनाला धारेवर धरत या सलगरा फाटा ते बेटमोगरा हा रस्त्याचे काम चालू करण्यास प्रशासनाला भाग पाडले. सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी पाठपुरावा केलेल्या प्रयत्नाला यश जरी मिळाले असले तरीही गेली एक ते दीड महिना संपला या रस्त्याचे प्राथमिक स्वरूपाचे काम म्हणजेच खराब झालेला रस्ता जेसीबीच्या सहाय्याने रोड उखरले न उखरले  त्या च्यावरच दबई करून थातूरमातूर स्वरूपाचे व निकृष्ट दर्जाचे काम संबंधित गुत्तेदार व इंजिनियर यांच्या मार्फत होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. गेली महिनाभरापासून या रस्त्याच्या कामाला उतरती कळा लागली असून कामाची गती
मंदावली असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप 
उफळून आल्याचे दिसून येत आहे.
या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य मोठ्याप्राणावर पसरले असल्याने नागरिकांसह वाहन चालकांच्या
आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुखेड तालुक्यातील सलगरा फाटा ते बेटमोगरा हा 11 किलोमीटरचा अंतर असून या रस्त्याचे काम मुखेड येथील चौधरी कॉन्ट्रॅक्टशेन यांच्या मार्फत करण्यात येत आहे. जवळपास एक महिनाभरापूर्वी
कंत्राटदार विलास चौधरी यांच्या मार्फत विविध यंत्रसामुग्रीच्या लवाजम्यासह काम सुरू तर झाले व सुरुवातीचे दोन ते तीन दिवसच प्राथमिक स्वरूपाचे थातुर मातुर काम करण्यात आले. यामध्ये अंदाजत्रका नुसार काम न करता गुतेदार व इंजिनिअर यांच्या मनोमिलनाणे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे व यावरती कसल्याच प्रकारची व्यवस्थितरीत्या मुरूम व गिटी चा पुरेपूर समावेश करण्यात न करताच लाल,पांढरी माती मिश्रीत मुरूम आणि गिटी चा वापर करून रस्त्याची दबई करण्यात आली असल्याने सद्यस्थितीत या मार्गावर गिटी आजूबाजूला पसरलेल्या अवस्थेत दिसून येत आहे.परंतु गेली महिनाभरा पूर्वी या रस्त्याचे काम चालू झालेले सद्या बंद अवस्थेत दिसून येते.
महिनाभरा पूर्वी कंत्रादारांमार्फत या रस्त्यावर मुरूम टाकून ठेवला आहे पण त्यावर पाणी न टाकल्यामुळे रोडवरील अवजड वाहनांमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य वाढून पडचाऱ्यासह रोड शेजारील शेतकरी व शेतमजूर तसेच दुचकीस्वार यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यासाठी रोडवर टाकलेल्या मुरुमावर दैनंदिन पाण्याचा शिंतोडा टाकणे गरजेचे असताना ही कंत्रादारांकडून जाणीवपूर्वक पाणी न टाकता धुळीच्या खाईत माणसांना लोटून मानवी आरोग्याशी खेळत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
अंदाजपत्रक प्रमाणे खोदकाम न करता सदर कंत्राटदाराने जुन्याच रोडवर जैसे थे अवस्थेत त्यावर थातूरमातूर मुरूम व गिटी टाकल्याने कामाचा दर्जा काय असेल हे सांगण्याची तूर्त गरज नसल्याचेही भारत सोनकांबळे यांनी सांगितले.
आणि या रस्त्याच्या कामाची तपासणी ही गुणनियंत्रण कक्ष औरंगाबाद कार्यालयामार्फत करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून व
सोनकांबळे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*बिलोली तालुक्यातील भटक्या जमातींच्या समस्या कधी संपणार_विजय सुर्यवंशी*

विशेष प्रतिनिधी नांदेड  आज देशाला स्वातंत्र्य मिळुन 73 वर्ष पूर्ण झाली तरी देशातील गोर-गरिब आणि भटक्या जमातीचे प्रश्न अजुन सुटलेले नाहीत. अश्या भटक्या जमातीतील पारधी आणि चितोजेय समाजातील लोकसंख्या बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे हा समाज आजही मुलभूत गरजा पासुन वंचित आहे कारण या दोन्ही समाजातील बहुतांश लोकांना अजूनही हक्कांचा निवारा मिळालेला नाही.आजंही बहुतांश लोक ग्रामिण रुग्णालय बिलोली या परिसरात रस्त्यावरच आपली गुजराण करत आहे त्यांची समस्या समजून घ्यायला कोणताही पुढारी समोर येत नाही. अश्या कठीण परिस्थितीत आपली आयुष्याची घटका मोजण्याच्या पारधी व चितोडीच्या या समाजातील लोकांना कोरोनाच्या संकटामुळे आणखी संकटाच्या खाईत लोटले अश्या हाताला कोणताही कामधंदा नसल्याने पोटाची खळगी भरणे सुद्धा त्यांना आवघड होऊन बसले आहे एक संवेदनशील समाजातील जबाबदार नागरिक म्हणून बिलोली  तालुक्यातील लोकप्रतिनिधीसह दानशुर नागरीकांनी  या दोन्ही समाजातील गरजू लोकांना त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची आणि उत्तम प्रकारे ते रांहु शकतील अश्या निवाय्राची  सोय करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग...

किराना दुकानदार झाले मालामाला ग्राहकांचे होत आहे बेहाल

नांदेड प्रतिनिधी  –वैभव घाटे  कोरोना ला आळा घालण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन बिलोली तालुक्यातील काही दुकानदार किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची जास्त भावाने विक्री करून परिस्थितीचा गैरफायदा घेऊन नागरिकांना लुटत आहेत. महाराष्ट्र व संपूर्ण देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने कोरोना ला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 31 मार्चपर्यंत तर केंद्र सरकारने 14 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. असे असले तरी नागरिकांना किराणा दूध भाजीपाला औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये, यासाठी दररोज एका ठराविक काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडे ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा अजिबात तुटवडा भासू नये, यासाठी सरकार विशेष खबरदारी घेत आहे. असे असले तरी बिलोली तालुक्यातील काही दुकानदारांकडून किराणा सामानासह जीवनावश्यक वस्तूंची जास्त दराने विक्री केल्या जात असून नागरिकांना खुलेआम लुटले जात आहे. साठेबाजी करून नागरिकांकडून जास्त पैसे घेऊन माणुसकी विकून खात आहेत   संपूर्ण देश...

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा चौथा स्तंभ वाऱ्यावर पत्रकारांसाठी आर्थिक तरतूद हवी - तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी (वैभव घाटे)  सद्यसथितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात करोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू या महाबीमारी ने धुमाकूळ माजवला असताना या बिकट परिस्थितीत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे राज्यात करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार वेगवेगळ्या भागात फिरून वार्तांकन करून सर्व सामान्य माणसाच्या व देशाच्या हितासाठी  आपले कुटुंब व संसार बाजूला ठेवून जनजागृती साठी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपली भूमिका अहोरात्र पार पाडत असून त्यांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने वर्तमान परिस्थितीत राज्य सरकार ने भरीव आर्थिक तरतूद करावी अशी मागणी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारी चा प्रादुर्भाव वाढत असून  या बाबत जनतेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झालेली आहे याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार प्रशासन च्या माध्यमातून उपाययोजना करत असले तरी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे राज्यातील पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेल...