मुख्य सामग्रीवर वगळा
जगातील सर्वात मोठी आध्यात्मिक संघटना
ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्य प्रशासिका 104 वर्षाच्या
राजयोगीनी दादी जानकी यांचे माऊंट आबू येथे निधन


नांदेड  प्रतिनिधी  वैभव घाटे


 (दि. 27 मार्च) स्त्रीशक्तिद्वारा संचलित जगातील सर्वात मोठी संघटना प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशासिका  ‘स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ राजयोगीनी ब्रह्माकुमारी डॉ. जानकीदादी यांचे वयाच्या 104 व्या वर्षी निधन झाले. माऊंट आबू , राजस्थान येथील ग्लोबल हॉस्पिटल मध्ये 27 मार्च रोजी सकाळी 2 वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांना गेल्या दोन महिन्यापासून श्वास आणि पोटाचा आजार होता, त्यांचेवर यासाठी उपचारही सुरु होते. त्यांचे अंतिम संस्कार ब्रह्माकुमारीज् मुख्यालय शांतीवन येथील संमेलन सभागृहासमोरील मैदानात आज दुपारी 3.30 वाजता होईल

     स्त्री शक्तिच्या प्रेरणास्त्रोत ब्रह्माकुमारी दादी जानकी यांचा जन्म 1 जानेवारी 1916 मध्ये हैद्राबाद सिंध येथे झाला. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी ब्रह्माकुमारीज् संस्थेचा आध्यात्मिक मार्ग निवडला व त्यात त्या संपूर्णपणे समर्पित झाल्यात. आध्यात्मिक प्रगतीचे शिखर पादाक्रांत केलेल्या राजयोगीनी दादी जानकी यांचे शिक्षण केवळ इयत्ता चौथीपर्यंत झाले. परंतु आध्यात्मिक प्रगतीच्या आभाने तेजपू्ंज होऊन त्यांनी जगात भारतीय दर्शन, राजयोग आणि मानवीय मूल्यांच्या स्थापनेसाठी केलेले कार्य अद्वितीय ठरले. भारताप्रमाणे विदेशातही राजयोगाचा प्रसारासाठी त्यांनी सन 1970 मधील पाश्चिमात्य देशांचा दौरा केला. जगातील 140 देशामध्ये मानवीय मूल्यांचे बीजारोपण करुन हजारो सेवाकेंद्रांची स्थापना करुन लाखों लोकांमध्ये एक नवीन जीवन फुलविले.

राजयोगीनी दादी जानकी यांनी  मन, आत्मा यांच्या आंतरीक स्वच्छतेबरोबर बाह्य स्वच्छतेसाठीही अद्वितीय कार्य केले. ज्यायोगे भारत सरकारने त्यांना स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अॅम्बेसिडर बनविले होते. दादी जानकी यांच्या देहावसानची बातमी ऐकताच देश विदेशातील संस्थेच्या अनेक सदस्यांनी त्यांचेसाठी योगाभ्यास सुरु केला. त्यांचे पार्थीव शरीर माऊंट आबू हून आबूरोड शांतीवन येथे आणले जाईल. भावपूर्ण श्रद्धांजली नंतर पंचतत्वात विलीन केले जाईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*बिलोली तालुक्यातील भटक्या जमातींच्या समस्या कधी संपणार_विजय सुर्यवंशी*

विशेष प्रतिनिधी नांदेड  आज देशाला स्वातंत्र्य मिळुन 73 वर्ष पूर्ण झाली तरी देशातील गोर-गरिब आणि भटक्या जमातीचे प्रश्न अजुन सुटलेले नाहीत. अश्या भटक्या जमातीतील पारधी आणि चितोजेय समाजातील लोकसंख्या बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे हा समाज आजही मुलभूत गरजा पासुन वंचित आहे कारण या दोन्ही समाजातील बहुतांश लोकांना अजूनही हक्कांचा निवारा मिळालेला नाही.आजंही बहुतांश लोक ग्रामिण रुग्णालय बिलोली या परिसरात रस्त्यावरच आपली गुजराण करत आहे त्यांची समस्या समजून घ्यायला कोणताही पुढारी समोर येत नाही. अश्या कठीण परिस्थितीत आपली आयुष्याची घटका मोजण्याच्या पारधी व चितोडीच्या या समाजातील लोकांना कोरोनाच्या संकटामुळे आणखी संकटाच्या खाईत लोटले अश्या हाताला कोणताही कामधंदा नसल्याने पोटाची खळगी भरणे सुद्धा त्यांना आवघड होऊन बसले आहे एक संवेदनशील समाजातील जबाबदार नागरिक म्हणून बिलोली  तालुक्यातील लोकप्रतिनिधीसह दानशुर नागरीकांनी  या दोन्ही समाजातील गरजू लोकांना त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची आणि उत्तम प्रकारे ते रांहु शकतील अश्या निवाय्राची  सोय करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग...

किराना दुकानदार झाले मालामाला ग्राहकांचे होत आहे बेहाल

नांदेड प्रतिनिधी  –वैभव घाटे  कोरोना ला आळा घालण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन बिलोली तालुक्यातील काही दुकानदार किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची जास्त भावाने विक्री करून परिस्थितीचा गैरफायदा घेऊन नागरिकांना लुटत आहेत. महाराष्ट्र व संपूर्ण देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने कोरोना ला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 31 मार्चपर्यंत तर केंद्र सरकारने 14 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. असे असले तरी नागरिकांना किराणा दूध भाजीपाला औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये, यासाठी दररोज एका ठराविक काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडे ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा अजिबात तुटवडा भासू नये, यासाठी सरकार विशेष खबरदारी घेत आहे. असे असले तरी बिलोली तालुक्यातील काही दुकानदारांकडून किराणा सामानासह जीवनावश्यक वस्तूंची जास्त दराने विक्री केल्या जात असून नागरिकांना खुलेआम लुटले जात आहे. साठेबाजी करून नागरिकांकडून जास्त पैसे घेऊन माणुसकी विकून खात आहेत   संपूर्ण देश...

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा चौथा स्तंभ वाऱ्यावर पत्रकारांसाठी आर्थिक तरतूद हवी - तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी (वैभव घाटे)  सद्यसथितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात करोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू या महाबीमारी ने धुमाकूळ माजवला असताना या बिकट परिस्थितीत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे राज्यात करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार वेगवेगळ्या भागात फिरून वार्तांकन करून सर्व सामान्य माणसाच्या व देशाच्या हितासाठी  आपले कुटुंब व संसार बाजूला ठेवून जनजागृती साठी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपली भूमिका अहोरात्र पार पाडत असून त्यांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने वर्तमान परिस्थितीत राज्य सरकार ने भरीव आर्थिक तरतूद करावी अशी मागणी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारी चा प्रादुर्भाव वाढत असून  या बाबत जनतेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झालेली आहे याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार प्रशासन च्या माध्यमातून उपाययोजना करत असले तरी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे राज्यातील पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेल...