मुख्य सामग्रीवर वगळा

शासनाचा सुशिक्षित बेरोजगार नर्सेसच्या जिवाशी खेळ - ब्रदर आदी बनसोडे यांचा सरकारशी थेट आरोप





मुखेड प्रतिनिधी भारत सोनकांबळे
महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी लाखो नर्सेस उत्तीर्ण होतात, यामध्ये एएनएम,जिएनएम, बिएससी नर्सिंग असे लाखो रुपये खर्च करून शिक्षण घ्यावे लागते लगेच खाजगी हाॅस्पिटल मध्ये कामासाठी भन्नाट फिरुन ड्युटी जाॅईन करतात ते पण सात ते आठ हजार महिना काम करतात, २०१६ च्या कोर्ट नियमानुसार खाजगी नर्सेसला दवाखान्याच्या बेड वरुन म्हणजेच विस ते पंचवीस हजार पगार द्यावा असे कोर्ट म्हणतो तो नियम लागू करत नाहीत, आणि खाजगी हाॅस्पिटल मध्ये बोगस स्टाॅफ भरती करुन पाच हजार महिना काम देतात,मग रजिस्टर नर्सेस कुठे जायचं,लाखो रुपये तिन ते चार वर्ष शिक्षण घेऊन पाच हजारांवर महिना लाज वाटत आहे..

आता महत्वाचे म्हणजे कोरोणा व्हायरस आला आहे सर्व देशभरात भीतीचे वातावरण तयार झाले, शेजारच्या देशात आरोग्य सेवा देणारे डाॅक्टर, नर्सेस व इतर स्टाॅफ कोरोणाच्या रुग्णांचा उपचार करुन तेच मरण पावले आहेत, तरीही नर्सेस ड्युटी करत आहेत, 

महाराष्ट्रात सरकारी दवाखाने असे आहेत की, तिन तेरा नऊ अठरा वाजलेली परिस्थिती आहे,तातडीच्या वेळी सोईसुविधा उपलब्ध नाहीत, तातडीचे इंजेक्शन नाहीत, डॉक्टर नर्सेस पण जास्तीचे नाहीत हे सरकारला माहिती आहे म्हणून कोरोणा व्हायरससाठी कंत्राठी पद भरती काढलेली आहे ते पण तिन महिन्यासाठीच आणि कोरोणा असे पर्यंत विस हजार पगार देणार, एवढा मोठा भयानक रोगाच्या विरुद्ध नर्सेस आपला जिव धोक्यात घालून तिथे ड्युटी करतात आणि त्यांना फक्त कंत्राठीवर,कामापुरते मामा,नंतर काॅन्ष्ट्राक्ट संपल्यावर वाऱ्यावर जगायचे का? अगोदरचे तुमचे जावई म्हणजे पर्मनंट साठ ते सत्तर हजार पगार वाले ते काय आराम साध्या जनरल वार्ड मध्ये ड्युटी करणार आणि कंत्राटी कोरोणा वार्ड मध्ये ड्युटी करायचं, पर्मनंट नर्सेसना कोरोणा वार्ड मध्ये ड्युटी लावावेत व कंत्राठी धारकांना इतर वार्ड मध्ये ड्युटी लावा, नाहीतर कंत्राठी ऐवजी पर्मनंट भरती करुन पगार वाढ द्यावा आणि आमच्या नर्सेसना मरणांच्या दारात सोडू नका?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*बिलोली तालुक्यातील भटक्या जमातींच्या समस्या कधी संपणार_विजय सुर्यवंशी*

विशेष प्रतिनिधी नांदेड  आज देशाला स्वातंत्र्य मिळुन 73 वर्ष पूर्ण झाली तरी देशातील गोर-गरिब आणि भटक्या जमातीचे प्रश्न अजुन सुटलेले नाहीत. अश्या भटक्या जमातीतील पारधी आणि चितोजेय समाजातील लोकसंख्या बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे हा समाज आजही मुलभूत गरजा पासुन वंचित आहे कारण या दोन्ही समाजातील बहुतांश लोकांना अजूनही हक्कांचा निवारा मिळालेला नाही.आजंही बहुतांश लोक ग्रामिण रुग्णालय बिलोली या परिसरात रस्त्यावरच आपली गुजराण करत आहे त्यांची समस्या समजून घ्यायला कोणताही पुढारी समोर येत नाही. अश्या कठीण परिस्थितीत आपली आयुष्याची घटका मोजण्याच्या पारधी व चितोडीच्या या समाजातील लोकांना कोरोनाच्या संकटामुळे आणखी संकटाच्या खाईत लोटले अश्या हाताला कोणताही कामधंदा नसल्याने पोटाची खळगी भरणे सुद्धा त्यांना आवघड होऊन बसले आहे एक संवेदनशील समाजातील जबाबदार नागरिक म्हणून बिलोली  तालुक्यातील लोकप्रतिनिधीसह दानशुर नागरीकांनी  या दोन्ही समाजातील गरजू लोकांना त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची आणि उत्तम प्रकारे ते रांहु शकतील अश्या निवाय्राची  सोय करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग...

किराना दुकानदार झाले मालामाला ग्राहकांचे होत आहे बेहाल

नांदेड प्रतिनिधी  –वैभव घाटे  कोरोना ला आळा घालण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन बिलोली तालुक्यातील काही दुकानदार किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची जास्त भावाने विक्री करून परिस्थितीचा गैरफायदा घेऊन नागरिकांना लुटत आहेत. महाराष्ट्र व संपूर्ण देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने कोरोना ला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 31 मार्चपर्यंत तर केंद्र सरकारने 14 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. असे असले तरी नागरिकांना किराणा दूध भाजीपाला औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये, यासाठी दररोज एका ठराविक काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडे ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा अजिबात तुटवडा भासू नये, यासाठी सरकार विशेष खबरदारी घेत आहे. असे असले तरी बिलोली तालुक्यातील काही दुकानदारांकडून किराणा सामानासह जीवनावश्यक वस्तूंची जास्त दराने विक्री केल्या जात असून नागरिकांना खुलेआम लुटले जात आहे. साठेबाजी करून नागरिकांकडून जास्त पैसे घेऊन माणुसकी विकून खात आहेत   संपूर्ण देश...

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा चौथा स्तंभ वाऱ्यावर पत्रकारांसाठी आर्थिक तरतूद हवी - तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी (वैभव घाटे)  सद्यसथितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात करोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू या महाबीमारी ने धुमाकूळ माजवला असताना या बिकट परिस्थितीत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे राज्यात करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार वेगवेगळ्या भागात फिरून वार्तांकन करून सर्व सामान्य माणसाच्या व देशाच्या हितासाठी  आपले कुटुंब व संसार बाजूला ठेवून जनजागृती साठी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपली भूमिका अहोरात्र पार पाडत असून त्यांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने वर्तमान परिस्थितीत राज्य सरकार ने भरीव आर्थिक तरतूद करावी अशी मागणी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारी चा प्रादुर्भाव वाढत असून  या बाबत जनतेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झालेली आहे याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार प्रशासन च्या माध्यमातून उपाययोजना करत असले तरी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे राज्यातील पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेल...