मुख्य सामग्रीवर वगळा

बेटमोगरा येथील नाथ गोसाई भिक्षुकाना धान्य वाटप.





मुखेड प्रतिनिधी / भारत सोनकांबळे
सद्यस्थितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात 
कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू ने थैमान घातले आहे, या कोरोना विषणुपासून बचाव करण्यासाठी जनतेनी घराबाहेर पडू नये म्हणून जनता कर्फुच्या माध्यमातून २१ दिवसाचे 
लॉकडाऊन चे आदेश देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्भूमीवर हातावर पोट असणाऱ्या गोर गरीब जनतेला धान्य पुरवठा संदर्भात तालुक्याचे आमदार डॉ.तुषार राठोड यांनी कार्यकर्त्यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने बेटमोगरा येथे धान्य वाटप करण्यात आले.
‘कोरोना विषाणू' संसर्गाने देश लॉकडाऊन झाला आहे.यामुळे देशातील अनेकजण आर्थिक संकटात सापडले आहेत.विशेषत: ज्यांचे पोट हातावर आहेत असा गरीब वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा परिसथितीमध्ये ते लोक करावेत तरी व खावेत तर काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे, असे लोक उपाशी राहू नये, म्हणून मुखेड तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ.तुषार राठोड यांनी कार्यकर्त्यांना आदेशित केले होते त्यांच्या आदेशाचे पालन करून तालुक्यातील बेटमोगरा गावातील युवा नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय बालाजी पाटील यांनी अशा भुकेल्यांच्या भुकेची जान लक्षात घेऊन दि.२९ मार्च रोजी बेटमोगरा येथील गरीब कुटूंबातील नाथ गोसाई (भिक्षुक) यांना तांदूळ,गहू,गोडतेल पॉकेट असे जीवनावश्यक धान्यांचे वाटप केले.
गरजू भुकेल्यांची भुक भागविण्यासाठी मुक्तहस्ते नाथ गोसाई भिक्षुक यांना दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले.या दानत्वातून माणूस पैशाने नाही,तर मनाने श्रीमंत आसायला पाहिजे हे निदर्शनास आले आहे.
यावेळी रामदास मुदळे,इमाम पिंजारी,विश्वनाथ शिंदे,उत्तम शिंदे,आदि सह महिला पुरुष उपस्थिती होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*बिलोली तालुक्यातील भटक्या जमातींच्या समस्या कधी संपणार_विजय सुर्यवंशी*

विशेष प्रतिनिधी नांदेड  आज देशाला स्वातंत्र्य मिळुन 73 वर्ष पूर्ण झाली तरी देशातील गोर-गरिब आणि भटक्या जमातीचे प्रश्न अजुन सुटलेले नाहीत. अश्या भटक्या जमातीतील पारधी आणि चितोजेय समाजातील लोकसंख्या बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे हा समाज आजही मुलभूत गरजा पासुन वंचित आहे कारण या दोन्ही समाजातील बहुतांश लोकांना अजूनही हक्कांचा निवारा मिळालेला नाही.आजंही बहुतांश लोक ग्रामिण रुग्णालय बिलोली या परिसरात रस्त्यावरच आपली गुजराण करत आहे त्यांची समस्या समजून घ्यायला कोणताही पुढारी समोर येत नाही. अश्या कठीण परिस्थितीत आपली आयुष्याची घटका मोजण्याच्या पारधी व चितोडीच्या या समाजातील लोकांना कोरोनाच्या संकटामुळे आणखी संकटाच्या खाईत लोटले अश्या हाताला कोणताही कामधंदा नसल्याने पोटाची खळगी भरणे सुद्धा त्यांना आवघड होऊन बसले आहे एक संवेदनशील समाजातील जबाबदार नागरिक म्हणून बिलोली  तालुक्यातील लोकप्रतिनिधीसह दानशुर नागरीकांनी  या दोन्ही समाजातील गरजू लोकांना त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची आणि उत्तम प्रकारे ते रांहु शकतील अश्या निवाय्राची  सोय करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग...

किराना दुकानदार झाले मालामाला ग्राहकांचे होत आहे बेहाल

नांदेड प्रतिनिधी  –वैभव घाटे  कोरोना ला आळा घालण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन बिलोली तालुक्यातील काही दुकानदार किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची जास्त भावाने विक्री करून परिस्थितीचा गैरफायदा घेऊन नागरिकांना लुटत आहेत. महाराष्ट्र व संपूर्ण देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने कोरोना ला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 31 मार्चपर्यंत तर केंद्र सरकारने 14 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. असे असले तरी नागरिकांना किराणा दूध भाजीपाला औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये, यासाठी दररोज एका ठराविक काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडे ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा अजिबात तुटवडा भासू नये, यासाठी सरकार विशेष खबरदारी घेत आहे. असे असले तरी बिलोली तालुक्यातील काही दुकानदारांकडून किराणा सामानासह जीवनावश्यक वस्तूंची जास्त दराने विक्री केल्या जात असून नागरिकांना खुलेआम लुटले जात आहे. साठेबाजी करून नागरिकांकडून जास्त पैसे घेऊन माणुसकी विकून खात आहेत   संपूर्ण देश...

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा चौथा स्तंभ वाऱ्यावर पत्रकारांसाठी आर्थिक तरतूद हवी - तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी (वैभव घाटे)  सद्यसथितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात करोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू या महाबीमारी ने धुमाकूळ माजवला असताना या बिकट परिस्थितीत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे राज्यात करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार वेगवेगळ्या भागात फिरून वार्तांकन करून सर्व सामान्य माणसाच्या व देशाच्या हितासाठी  आपले कुटुंब व संसार बाजूला ठेवून जनजागृती साठी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपली भूमिका अहोरात्र पार पाडत असून त्यांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने वर्तमान परिस्थितीत राज्य सरकार ने भरीव आर्थिक तरतूद करावी अशी मागणी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारी चा प्रादुर्भाव वाढत असून  या बाबत जनतेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झालेली आहे याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार प्रशासन च्या माध्यमातून उपाययोजना करत असले तरी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे राज्यातील पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेल...