मुख्य सामग्रीवर वगळा

धामणगाव येथील हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल रद्द,








हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल निमित 
दर्गाह येथे नागरिकांनी जमा होऊ नये- स.पो.नि. भाऊसाहेब मगरे

मुखेड प्रतिनिधी /भारत सोनकांबळे

सद्यस्थितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात 
कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू ने थैमान घातले आहे, या कोरोना विषणुपासून बचाव करण्यासाठी जनतेनी घराबाहेर पडू नये म्हणून जनता कर्फुच्या माध्यमातून २१ दिवसाचे 
लॉकडाऊन चे आदेश सरकारने दिले आहेत.तसेच देशात सर्वत्र कलम १४४ (जमाव बंदी) लागू करण्यात आला असल्याने मुखेड तालुक्यातील धामणगाव येथे होणारा प्रसिध्द व पारंपरिक हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल व यात्रा कोरोनाच संकट व संचारबंदी असल्यामुळे या वर्षी  उर्स संदल यात्रा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय गावकरी व पोलीस प्रशासनाच्या वतीने नुकताच घेण्यात आला आहे. हजरत बाबु पिर उर्स संदल दि.८ व ९ एप्रिल रोजी आयोजीत करण्यात आला होता.देशातील कोरोना च्या संकटाचे व संचारबंदी ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन हा महत्त्वपर्ण निर्णय घेण्यात आल्याचे  गावकरी व मुखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले व भाविकांनी याची नोंद घेऊन कोणीही दर्गाह परिसरात जमा होऊ नये,आपल्या घरात आपण सुरक्षित राहून प्रशासनास मदत करावी असे आवाहन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*बिलोली तालुक्यातील भटक्या जमातींच्या समस्या कधी संपणार_विजय सुर्यवंशी*

विशेष प्रतिनिधी नांदेड  आज देशाला स्वातंत्र्य मिळुन 73 वर्ष पूर्ण झाली तरी देशातील गोर-गरिब आणि भटक्या जमातीचे प्रश्न अजुन सुटलेले नाहीत. अश्या भटक्या जमातीतील पारधी आणि चितोजेय समाजातील लोकसंख्या बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे हा समाज आजही मुलभूत गरजा पासुन वंचित आहे कारण या दोन्ही समाजातील बहुतांश लोकांना अजूनही हक्कांचा निवारा मिळालेला नाही.आजंही बहुतांश लोक ग्रामिण रुग्णालय बिलोली या परिसरात रस्त्यावरच आपली गुजराण करत आहे त्यांची समस्या समजून घ्यायला कोणताही पुढारी समोर येत नाही. अश्या कठीण परिस्थितीत आपली आयुष्याची घटका मोजण्याच्या पारधी व चितोडीच्या या समाजातील लोकांना कोरोनाच्या संकटामुळे आणखी संकटाच्या खाईत लोटले अश्या हाताला कोणताही कामधंदा नसल्याने पोटाची खळगी भरणे सुद्धा त्यांना आवघड होऊन बसले आहे एक संवेदनशील समाजातील जबाबदार नागरिक म्हणून बिलोली  तालुक्यातील लोकप्रतिनिधीसह दानशुर नागरीकांनी  या दोन्ही समाजातील गरजू लोकांना त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची आणि उत्तम प्रकारे ते रांहु शकतील अश्या निवाय्राची  सोय करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग...

किराना दुकानदार झाले मालामाला ग्राहकांचे होत आहे बेहाल

नांदेड प्रतिनिधी  –वैभव घाटे  कोरोना ला आळा घालण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन बिलोली तालुक्यातील काही दुकानदार किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची जास्त भावाने विक्री करून परिस्थितीचा गैरफायदा घेऊन नागरिकांना लुटत आहेत. महाराष्ट्र व संपूर्ण देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने कोरोना ला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 31 मार्चपर्यंत तर केंद्र सरकारने 14 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. असे असले तरी नागरिकांना किराणा दूध भाजीपाला औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये, यासाठी दररोज एका ठराविक काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडे ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा अजिबात तुटवडा भासू नये, यासाठी सरकार विशेष खबरदारी घेत आहे. असे असले तरी बिलोली तालुक्यातील काही दुकानदारांकडून किराणा सामानासह जीवनावश्यक वस्तूंची जास्त दराने विक्री केल्या जात असून नागरिकांना खुलेआम लुटले जात आहे. साठेबाजी करून नागरिकांकडून जास्त पैसे घेऊन माणुसकी विकून खात आहेत   संपूर्ण देश...

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा चौथा स्तंभ वाऱ्यावर पत्रकारांसाठी आर्थिक तरतूद हवी - तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी (वैभव घाटे)  सद्यसथितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात करोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू या महाबीमारी ने धुमाकूळ माजवला असताना या बिकट परिस्थितीत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे राज्यात करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार वेगवेगळ्या भागात फिरून वार्तांकन करून सर्व सामान्य माणसाच्या व देशाच्या हितासाठी  आपले कुटुंब व संसार बाजूला ठेवून जनजागृती साठी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपली भूमिका अहोरात्र पार पाडत असून त्यांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने वर्तमान परिस्थितीत राज्य सरकार ने भरीव आर्थिक तरतूद करावी अशी मागणी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारी चा प्रादुर्भाव वाढत असून  या बाबत जनतेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झालेली आहे याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार प्रशासन च्या माध्यमातून उपाययोजना करत असले तरी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे राज्यातील पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेल...